[ad_1]
नजीकच्या भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा आपल्या जीवनावर व सर्वच शैक्षणिक शाखांवर लक्षणीय परिणाम होणार असल्याने यापासून अलिप्त राहणे आता शक्य नाही. ह्युमॅनिटीज व सोशल सायन्सेस अर्थात मानव्यशास्त्र व सामाजिक विज्ञान या कलाशाखाही याला अपवाद रा
.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. प्रीती जोशी म्हणाल्या, लिबरल आर्ट्सचे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात क्रिएटीव्ह फिल्ड अर्थात सर्जनशीलतेशी संबंधित क्षेत्रांमध्ये आपल्या करिअरची निवड करतात. यामध्ये फिल्म, थिऐटर, मीडिया, जाहिरात, कंटेंट क्रीएशन, पीआर, आर्ट अँड इव्हेंट मॅनेजमेंट, कंटेंट रायटिंग, डिझाईन, राजकारण अशा विविध शाखांचा समावेश असतो. या शाखांवर एआयचा मोठा प्रभाव पडणे अपेक्षित असल्याने लिबरल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना एआय व त्याचा नैतिक वापर शिकवणे गरजेचे आहे. या दृष्टीने आम्ही लिबरल आर्ट्सच्या पदवी अभ्यासक्रमात एआय संबंधी शिक्षणाचा अंतर्भाव करणार आहोत.
येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जुलै २०२५ पासून लगेचच एआय संबंधी शिक्षणाचा अंतर्भाव हा लिबरल आर्ट्स प्रशिक्षणात केला जाईल. यामध्ये काही विशेष शैक्षणिक सत्र व कार्यशाळांच्या माधमातून विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापक व विद्यापीठाबाहेरील या विषयाच्या तज्ञांची मदत घेतली जाईल, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.
[ad_2]