[ad_1]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अकोलेहून राजूरला जाताना त्यांची कार एका ट्रकला धडकली. त्यात लहामटे व त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले आहे
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, डॉक्टर किरण लहामटे व त्यांचे सहकारी मंगळवारी दुपारी अकोलेहून राजूरला जात होते. त्यांच्या कारने कोल्हार घोटी मार्गावरील विटे घाटात आली असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्यात त्यांच्या फॉर्च्युनर कारच्या समोरच्या भागाचे चांगलेच नुकसान झाले. ही घटना घडली तेव्हा आमदार लहामटे यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक व इतर कार्यकर्ते होते. सुदैवाने यापैकी कुणालाही या घटनेत गंभीर इजा झाली नाही. हे सर्वजण बालंबाल बचावले.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…
[ad_2]