[ad_1]
सोलापूर येथील प्रसिद्ध मेंदू विकारतज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेबाबत मोठे खुलासे समोर आले आहेत. मनीषाने एसपी न्युरोसायन्स हॉस्पिटलमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. पुढील तपासासाठी पोलिसां
.
मनीषा मुसळे ही न्यायालयीन कोठडीत होती. तिची पोलिस कोठडी मिळावी यासाठी आज तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने काही नवे दावे न्यायालयात मांडले. सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत आरोपी मनीषा मुसळेची 2 दिवसांची वाढीव कोठडी मंजूर केली.
मनीषाचे बँकेत तीन खाती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 42 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. मनीषा मुसळे माने हिने एसपी न्युरोसायन्स हॉस्पिटलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. विशेष म्हणजे तिच्या नावावर तीन बँक खाती असून त्यामध्ये सुमारे 70 लाख रुपये आढळले आहेत. या रकमेवर कोणताही कर भरलेला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बँक खात्यातील 70 लाख रुपयांपैकी 39 लाख रुपये पगाराव्यतिरिक्त कुठून आले? याचा ठोस पुरावा आरोपीकडे नाही, असा युक्तिवाद पोलिसांनी केला. तसेच, मनीषा मुसळे माने हिने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात पैसे देऊन त्यांच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेतले, असा दावा पोलिसांनी केला. हा सर्व व्यवहार संशयास्पद असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
जामिनाच्या विरोधासाठी जुनेच मुद्दे पुढे आणल्याचा आरोपीच्या वकिलाचा दावा
दुसरीकडे, मयत डॉ. शिरीष वळसंगकर किंवा फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर यांनी आरोपी महिलेवर कधीही आर्थिक गैरव्यवहाराचा थेट आरोप केलेला नाही, असा दावा मनीषा मानेच्या वकिलांनी कोर्टात केला. त्यामुळे पोलिसांनी केवळ जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी जुनेच मुद्दे पुन्हा पुढे आणले आहेत, असाही दावा मनीषा मानेच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.
दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन मनीषा मुसळे माने हिला 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील तपासात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा…
वळसंगकरांच्या शब्दाला उरली नव्हती किंमत:स्वतःच्याच दवाखान्यात उरले होते फक्त OPD चे अधिकार; सुसाईड नोटची होणार पडताळणी
डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी एक नवी माहिती उजेडात आली आहे. स्वतःच्या कष्टाने जे रुग्णालय नावारुपाला आणले त्या रुग्णालयात वळसंगकरांना केवळ ओपीडीचे अधिकार उरले होते. त्यांनी एखाद्या रुग्णाचे बिल कमी करण्याची सूचना केली तरी ते होत नव्हते. त्यांच्या शब्दाला कोणतीही किंमत उरली नव्हती. यामुळे ते तणावात होते, अशी माहिती अटकेतील मनीषा नामक महिलेने दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…
डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या का केली?:दोन पैकी 1 गोळी डोक्यातून आरपार जाऊन खिडकीवर आदळली; आत्महत्येपूर्वी काय घडले?
सोलापूर येथील प्रख्यात मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर (६९) यांनी शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास बंगल्यातील बेडरूममध्ये बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. डॉक्टरांनी दोन फैरी गोळ्या झाडून घेतल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली आणि काचेच्या खिडकीला थडकली, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली. बेशुद्धावस्थेत असताना त्यांना त्यांच्याच एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी पाच डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु रात्री १० वाजून २० मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. त्याच्या मागे पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली असा परिवार आहे. पूर्ण बातमी वाचा…
[ad_2]