Fraud in the name of Kerala trip and work from home Pune | केरळ सहल आणि वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणूक: पर्यटन कंपनी आणि सायबर चोरट्यांकडून 18 लाखांची लूट – Pune News

0

[ad_1]

केरळ सहलीच्या आमिषाने पर्यटकांची पावणेनऊ लाखांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्यटन कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

.

याप्रकरणी प्रणीत सोरटे (वय ३२), प्रतीक सोरटे (वय ३३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरटे हे सख्खे भाऊ आहेत. दोघांनी कात्रज भागात फिनिक्स टुरिझम नावाची पर्यटन कंपनी सुरू केली होती. तक्रारदार वडगाव खुर्द भागात राहायला आहेत. सोरटे यांनी केरळ सहलीचे आमिष दाखविले होते. तक्रारदार आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांना या सहलीसाठी नोंदणी केली होती. सुरुवातीला त्यांच्याकडून एक लाख ९५ हजार ३५० रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी सहल रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे परत केले नाही. अशाच पद्धतीने दोघांनी आणखी काही जणांकडून पैसे घेतले. सहल रद्द केल्यानंतर त्यांनी पैसे परत न केल्याने सोरटे यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. दोघांनी एकूण मिळून आठ लाख ७२ हजार ९२३ रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.

सायबर चोरट्यांकडून महिलेची आर्थिक फसवणूक

वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले होते. नामवंत हॉटेलची जाहिरात समाज माध्यमात प्रसारित करुन त्याला लाइक्स मिळवून दिल्यास दररोज १५०० ते सहा हजार रुपये मिळवा, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला महिलेला एक काम दिले. महिलेने हे काम पूर्ण केल्यानंतर तिच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये जमा केले.चोरट्यांनी पैसे जमा केल्यानंतर महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यात महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी साडेनऊ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पुढील तपास करत आहेत.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here