[ad_1]
विदर्भ राज्य मिळवण्याचा संकल्प करून मंगळवार १३ रोजी दुपारी १ वाजता विदर्भ चंडिकेपासून विदर्भ संकल्प पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ विदर्भवादी नेते बाबाराव शेळके, मुकेश मासुरकर व सुनील चोखारे व इतर २२ सहकाऱ्यांसह विदर्भ चंडिकेला नमन करून इतवा
.
नागपूर ग्रामीण, वर्धा जिल्ह्यातून १२ दिवस प्रवास करून १३ व्या दिवशी २५ मे रोजी समारोप अमरावती येथील अभियंता भवन, शेगाव नाका येथे होणार आहे.
महाराष्ट्रात राहुन विदर्भाच्या हक्काचा नागपूर कराराप्रमाणे न मिळालेला २३ टक्के निधी, २३ टक्के नोकरीच्या संधी व निधी अभावी अपूर्ण असलेली १३१ धरणे, न मिळालेला ६५ हजार कोटींचा सिंचनाचा निधी त्यामुळे ओलिताखाली न येऊ शकलेली १४ लाख हेक्टर जमीन यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहे.
शिवाय २३ खनिजे व ७० टक्के वीज बारमाही वाहणाऱ्या नद्या व ५४ टक्के वनसंपदा असूनही विदर्भात उद्योग आले नाही. नक्षलवादाचा प्रश्न, न वाढलेले दरडोई उत्पन्न, कुपोषणाचा प्रश्न, त्यामुळे दरवर्षी होणारे बालमृत्यू व गर्भारमाता मृत्यू, ७० टक्के औष्णिक वीज तयार होत असल्यामुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे निर्माण झालेला जीवघेणा प्रदूषणाचा प्रश्न सुटलेले नाही. यावर वेगळा विदर्भ हाच उपाय आहे, हे सांगण्यासाठी संकल्प यात्रा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
[ad_2]