[ad_1]
वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील तलवाडा येथील नागवाडी धरण परिसरात आज दिवसभरात बिबट्याचे तीन वेळा दर्शन झाले. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. याच भागात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जीरी गावात एका वयोवृद्ध म
.
घटनेची माहिती मिळताच वनसंरक्षक एफ. जी. मुढे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नागरिकांना फटाके वाजवण्याचं आवाहन केलं. बिबट्याला पकडण्यासाठी जागा बदलून पिंजरे लावण्यात आले आहेत. तोपर्यंत परिसरात रात्रंदिवस गस्त सुरू ठेवण्यात येणार आहे. वनविभाग सतर्क आहे. मात्र बिबटे किती आहेत, याचा अंदाज लागत नाही.
वनविभागाने नागरिकांना सूचना रात्री किंवा अपरात्री एकट्याने घराबाहेर पडू नये. हातात बॅटरी घ्यावी. फटाके वाजवावेत. थाळीचा मोठ्याने आवाज करावा. लहान मुलांना एकटे सोडू नये. शाळेत ने-आण करताना पालकांनी स्वतः काळजी घ्यावी. रात्री काम करताना आवाज करत राहावे. रस्त्याने जाताना बोलत जावे. एकट्याने फिरू नये. पाळीव प्राण्यांना कुंपणात बांधावे. घराभोवती रात्री प्रकाश असावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्यासदृश प्राणी दिसल्यास वनविभागाशी संपर्क साधावा.
[ad_2]