[ad_1]
साहित्य जीवनाचे संजीवनी आहे आणि त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी पातूर येथे ६२ व्या अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. स्व. नामदेवराव राखोंडे गुरुजी साहित्य नगरी, डॉ
.
प्रा. वसंत पुरके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी साहित्याचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, अविद्या हा कॅन्सर आहे. जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही. सिनेमाकडेही साहित्यकृतीप्रमाणे पाहावे, कारण जीवनातील कोणतीही गोष्ट प्रामाणिकतेने केली तर यश हमखास मिळते. समारंभाला संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे, ज्येष्ठ साहित्यिक रमेश अंधारे, साधना निकम, पुष्पराज गावंडे, हिंमतराव ढाळे, प्राचार्य किरणकुमार खंडारे, प्रा. सदाशिव शेळके, अशोक रघुवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी तुळशीराम बोबडे यांच्या “सत्संग’, नारायण अंधारे यांच्या “भारत देश हरतो तेव्हा’, वासुदेव खोपडे यांच्या “मृत्युंजय’, विष्णू महेशने यांच्या “लक्ष्मी’, डॉ. मनोहर घुगे यांच्या “अक्षरेच माझे सांगाती’, राहुल भगत यांच्या “वलय’ आणि “तहान’ या अधिग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. समारोप कार्यक्रमात शेतकरी जागरण मंचाचे प्रशांत गावंडे, संमेलन अध्यक्ष तुळशीराम बोबडे, स्वागताध्यक्ष नारायण अंधारे, हनुमंत डोपेवाड, भाजप जिल्हाध्यक्ष वैशाली निकम, बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक माजी प्राचार्य विजयसिंह गहिलोत, ज्येष्ठ साहित्यिक रमेश अंधारे, माजी प्राचार्य जयसिंग जाधव, प्राचार्य किरण कुमार खंडारे, शिवाजी कॉलेजचे प्राचार्य रामेश्वर भिसे, संदीप देशमुख उपस्थित होते. साहित्य प्रेरणादायी आहे आणि जीवनाला नवी दिशा देते. या दोन दिवसाच्या संमेलनाने साहित्याच्या महत्त्वाला नव्याने उजाळा दिला आणि या दोन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये गझल मुशायरा, कवी संमेलन, महिलांचे स्वतंत्र कवी संमेलन, परिसंवाद, कथाकथन सादर झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत : कार्यक्रमाची सुरुवात प्रा. विलास राऊत यांच्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर प्रा. करुणा गवई यांनी “मेरे वतन के लोगो” या देशभक्तीपर गीताने उपस्थितांचे मन भारावून टाकले.
साहित्यिकांचे मार्गदर्शन : संमेलनाचे अध्यक्ष तुळशीराम बोबडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “साहित्य संमेलने जीवनाला नवी दिशा देतात. ग्रामीण जनमानसाचे यथार्थ चित्रण साहित्यातून उमटणे गरजेचे आहे. संत महापुरुषांचा विचार जनमानसात उजविण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. संमेलनाचे प्रास्ताविक हिम्मत ढाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय कावरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. शांतीलाल चव्हाण यांनी केले.
ग्रंथदिंडीने वेधले रसिकांचे लक्ष पातूर शहरात सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या अतिशय सुंदर सजवलेल्या ग्रंथदिंडीचे पूजन पातूर तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या हस्ते तसेच उपस्थित जेष्ठ साहित्यिक मान्यवर यांच्या हस्ते करून या दिंडीची सुरुवात करण्यात आली. ही दिंडी डॉ. एच. एन. महाविद्यालय येथे निघून जुने बस स्थानक, मिलिंद नगर, संभाजी महाराज चौक अशी निघून परत डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय येथे समारोप करण्यात आला आहे. या दिंडीमध्ये वारकरी सांप्रदायिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
[ad_2]