Maintaining the tradition of Kirtan and sermons, Sarthak Bhujade, a student of Appaji Maharaj Warkari Jnanpith in Bahiram, passed 10th class ‘Sarthak’ with 92% | कीर्तन, प्रवचन परंपरा सांभाळून 10वी ‘सार्थक’: बहिरमच्या अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठातील विद्यार्थी सार्थक भुजाडेला 92%‎ – Amravati News

0

[ad_1]

कीर्तन, प्रवचनाची वारकरी परंपरा सांभाळून सार्थक अर्जुन भुजाडे या विद्यार्थ्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी घोषित केलेल्या दहावीच्या निकालात ९२ टक्के गुण मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सार्थक संगणकावर बसला तरी डोक्यावर प

.

जिल्ह्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत गुलाबराव महाराज, संत अच्युत महाराज असा संत परंपरेचा मोठा वारसा लाभला असून, याच संस्कारांतर्गत जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कुऱ्हा (बहिरम) येथे वैकुंठवासी अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ आहे. या डिजिटल वारकरी ज्ञानपीठात विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाच्या शिक्षणासोबत शालेय शिक्षणही दिले जाते. याच वारकरी ज्ञानपीठातील विद्यार्थी सार्थक अर्जुन भुजाडेला दहावीत ९२ टक्के गुण मिळाले आहेत. यावेळी वारकरी ज्ञानपीठाद्वारे सार्थकचे अभिनंदन करण्यात आले.

सार्थक शालेय शिक्षणात हुशार आहेच. त्याच बरोबर तो कीर्तनही करतो. त्याला प्रवचन, पखवाज वादन, तबला वादन, हरिपाठ, श्रीमद् भगवत गीतेतील श्लोकांचा अभ्यास आहे. तो संगणक शास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासही करतो.

वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर भारतीय म्हणाले, की “वैकुंठवासी अप्पाजी महाराज हे डिजिटल गुरुकुल आहे. इथे संगणक शास्त्रही शिकवले जाते. केवळ अध्यात्मच नव्हे तर ज्ञान व विज्ञान यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी वारकरी ज्ञानपीठ प्रयत्न करत आहे. या वारकरी ज्ञानपीठातील विद्यार्थी सार्थक भुजाडे हा उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याचा संस्थेला आनंद आहे. सार्थकने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, संस्थेचे अध्यक्ष सुधीर भारतीय, संस्थेचे सचिव अनंत भारतीय, वारकरी ज्ञानपीठाचे आचार्य लक्ष्मण लटपटे आळंदीकर, गुरुदेव छोगमल मालू शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राऊत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे. भाजप नेते तुषार भारतीय यांनी सार्थकचे अभिनंदन केले आहे. रामकृष्ण हरी, मी वारकरी संप्रदाय, संगणक शास्त्र, आर्टिफिशल इंटेलिजन्स असे तंत्रज्ञानाचे तसेच व्यावहारिक असे तीन प्रकारचे एकाचवेळी शिक्षण घेत आहे. अशात नियमित अभ्यासाद्वारे मी दहावीत ९२ टक्के गुण मिळवले, याचा माझ्यासह माझ्या गुरूजनांनाही मनापासून आनंद झाला आहे. कीर्तन हे माझे आवडते क्षेत्र आहे. त्यामुळे मी शिक्षणासोबतच त्यासाठीही सारखेच परिश्रम घेत असतो, असे दिव्य मराठीशी बोलताना सार्थकने सांगितले आहे.

रामकृष्ण हरी, मी तीन प्रकारचे एकाचवेळी शिक्षण घेतोय

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here