BJP to build new organization in Vidarbha nagpur news | भाजपची विदर्भात नवी संघटना बांधणी: नागपूर शहराध्यक्षपदी माजी महापौर दयाशंकर तिवारी, विदर्भात १९ अध्यक्षांची नियुक्ती – Nagpur News

0

[ad_1]

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभेत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघटन बांधणी केली आहे. विदर्भातील दोन अध्यक्ष वगळता सर्वांना बदलवले आहे. खामगाव व अकोल्यातील अध्यक्षांना कायम ठेवण्यात आले तर, चंद्रप

.

नागपुरात माजी महापौर दयाशंकर तिवारी यांना शहराध्यक्ष करण्यात आले आहे. बंटी कुकडे व बाल्या बोरकर हे आलटुन पालटुन शहराध्यक्ष होत होते. यावेळेस तिवारी यांचे नाव चर्चेत नसताना धक्कातंत्र देत जाहीर करण्यात आले. स्वयंसेवक असलेले तिवारी हिंदुत्ववादी चेहरा आहे.

भाजपने मंडळांची संख्या वाढवली तसेच, नागपूर व अमरावती ग्रामीण शिवसेनेप्रमाणे दोन अध्यक्ष दिले. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत ७८ अध्यक्ष आहेत. विदर्भात १७ होते आता १९ झाले आहेत. यावेळी काटोल आणि मेळघाट अशा दोन अध्यक्षांची भर पडली. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी मंगळवारी ५८ अध्यक्षांची घोषणा केली, २२ अद्याप प्रलंबित आहेत. पक्षाने विदर्भात समतोल साधण्याचा प्रयत्न केला. सामाजिक समीकरण लक्षात घेतले आणि महिलांना देखील संधी दिली.

अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांचा विचार करण्यात आला. महापालिका, जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनेची रचना केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेवर कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित झाले आहे. अध्यक्षपदासाठी ४५ ते ६० वयोगट आणि आमदार नको, असे पक्षाचे धोरण होते.

गेल्यावेळी आमदारांना नेमण्यात आले. अध्यक्ष व आमदार एकच राहिल्यास दोन्ही पदांना न्याय दिला जात नाही, म्हणून भाजपाने या वेळेस निकष बदलवले. विदर्भातील अध्यक्ष खामगावचे सचिन देशमुख आणि अकोला शहरचे जयवंत मसणे यांना कायम ठेवण्यात आले.

नागपूर शहर – दयाशंकर तिवारी

ग्रामीण रामटेक -आनंदराव राऊत

काटोल – मनोहर कुंभारे

बुलढाणा -विजयराज शिंदे

अकोला ग्रामीण – संतोष शिवरकर

वाशीम – पुरुषोत्तम चितलांगे

​​​​​​​अमरावती – नितीन धांडे, ​​​​​​​ग्रामीण – रविराज देशमुख

यवतमाळ – प्रफुल्ल चव्हाण

पुसद – डॉ. आरती फुफाटे

​​​​​​​मेळघाट – प्रभूदास भिलावेकर

​​​​​​​भंडारा – आशु गोंडाने

​​​​​​​गोंदिया – सीता रहांगडाले

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here