[ad_1]
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसापासून हा पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत संलग्न होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. यामुळे शरद पव
.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बदलण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आज झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देखील या विषयावर चर्चा झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसात पक्षातील बदल समोर येतील. मात्र यामध्ये रोहित पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डावलले जात असल्याची रोहित पवार यांनी व्यक्त केलेली भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचली असून अप्रत्यक्षपणे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होताना दिसत आहे.
पक्षाच्या वतीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडून हे पद काढून नवीन युवकाला या ठिकाणी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थी अध्यक्ष सुनील गावडे यांची देखील उचलबांगडी होऊन त्यांच्या जागेवर नवीन विद्यार्थी अध्यक्ष पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थीनी प्रदेशाध्यक्ष पद तसेच अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष पद सध्या खाली आहे. ही दोन्ही पदे देखील आमदार रोहित पवार यांच्या मर्जीने भरली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सर्व प्रवक्त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे.
महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे कायम
यामध्ये महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा दीड वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तरी देखील त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर ओबीसी अध्यक्ष आणि सामाजिक न्याय सेलच्या अध्यक्ष यांना देखील पदावर कायम ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर इतर काही महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांची उचलबांगडी होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
[ad_2]