[ad_1]
बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन एका व्यक्तीच्या नावाने बनावट बँक खाते उघडून कर्जाच्या माध्यमातून दाेन काेटी ८२ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रणजीत इंद्रजीत कदम (रा. कात्रज,पुणे) व रुपाली चंद्रकांत देसाई (रा. जयसिंगपू
.
याबाबत आराेपी विराेधात पाेलिसांकडे अशाेक हरीप्रसाद नाेपानी (वय- ७४,रा. उंड्री,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार ऑगस्ट २०२२ ते आतापर्यंत घडलेला आहे. तक्रारदार यांनी सन २०१३ मध्ये तीन बेडरुमचा फ्लॅट मावळ तालुक्यातील गहुंजे येथील द्रुतगती मार्गालगत लाेधा बिल्डरच्या साेसायटीत घेतला हाेता. सन २०२२ मध्ये त्यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी सदर फ्लॅट विक्रीस काढला हाेता. त्यावेळी ब्राेकरच्या माध्यमातून रणजित कदम याने सदर फ्लॅट घेण्याकरिता सहमती दर्शवत दाेन ते तीन वेळा बाेलणी देखील केली. त्यात एक काेटी ९५ लाख रुपयांना सदर व्यवहार ठरला हाेता.
नाेव्हेंबर २०२२ मध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात ते गेले असता, सदर ठिकाणी कदम याने सांगितले की, त्यांची मिळकत त्याची बहीण रुपाली देसाई हिच्यासाेबत फ्लॅट घेणार आहे. तिने एक महिन्यात माझ्या नावे कर्ज भेटेल त्यानंतर सदर मिळकतीचा सेल डीड करु असा अॅग्रीमेंट फाॅर सेल हा करारनामा वडगाव येथील सबरजिस्टर कार्यालयात झाला. परंतु रुपाली देसाई यांची कर्जाची व्यवस्था न झाल्याने तक्रारदार यांनी सदर व्यवहार रद्द करण्याची विनंती केली. परंतु देसाई यांनी त्यानंतर तक्रारदार यांचा फाेन उचलणे बंद केले . तर कदम यांनी मी कर्जाचे पाहताे तुम्ही व्यवहार रद्द करु नका सांगितले.
त्यानंतर कदम यांनी देसाई आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अंधेरी शाखा व पंजाब सिंध बँक शिवाजीनगर शाखा यांच्यातील अधिकाऱ्यांशी संगनमत करुन संबंधित मिळकतीबाबत बनावट डाॅक्युमेंट बनवून फ्लॅट परस्पर नावावर करुन घेतला. तसेच देसाई यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने एक काेटी ४२ लाखांचे तर पंजाब सिंध बँकेने एक काेटी ४० लाखांचे कर्ज कागदपत्रांची काेणतीही शहानिशा न करता फ्लॅट तारण ठेऊन दिले. न्यायालयात याबाबत दावा दाखल झाल्यावर आराेपींनी तक्रारदार यांच्या नावाने बनावट खाते द जळगाव पीपल्स काे ऑपरेटिव्ह बँक आकुर्डी शाखेत उघडल्याचे देखील स्पष्ट झाले. त्यानुसार याबाबत आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ad_2]