[ad_1]
बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावरील वाहनांची ताेडफाेड करत आम्हीच इथले भाई असल्याचे म्हणत आमच्या नादाला काेणी लागायचे नाही, काेणी समाेर आला तर त्याला संपवून टाकु अशी धमकी देत अल्पवयीन मुलांच्या टाेळक्याने दहशत पसरवण्याचा प्रकार वानवडी परिसरातील रामटेकडी
.
याबाबत ऋषिकेश देडे (वय- 19,रा. हडपसर,पुणे) या आराेपीला अटक करण्यात आली आहे. तर 17 वर्षाचे तीन मुले, 16 वर्षाचा एक मुलगा आणि 13 वर्षाचा एक मुलगा यांचे विराेधात भान्यास 189 (2),190, 119 (1), 119 (2), 119 (3), 352, 324 (4) (5), क्रिमिनल लाॅ अमेंडमेंट 7 , मपाेअधि 37 (1), (3), 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राकेश श्रीनिवास साळवी (वय- 38,रा.हडपसर,पुणे) यांनी आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. हडपसर परिसरातील रामटेकडी भागात स्वामी विवेकानंद नगर मध्ये सदर आराेपी मुलांनी बेकायदेशीर टाेळके जमवले. त्यानंतर रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या नागरिकांचे पाच वाहनांवर दगड मारुन काचा फाेडून नुकसान केले. याप्रकारामुळे नागरिक भयभीत झाल्यावर आराेपी सैरावैरा खुप आरडाआेरड करुन सदर भागात दगडफेक केली. आम्ही इथले भाई आहाेत, आमचे नादाला काेणी लागायचे नाही, काेणी समाेर आला तर त्याला संपवून टाकु अशी धमकी देऊन सदर भागात दहशत पसरवली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक एस भाेसले पुढील तपास करत आहे.
पार्किंगच्या वादातून तरुणावर काेयत्याने वार
शिवाजीनगर भागातील सुर्यमुखी मंदिर जवळ शिराेळी वस्ती येथे बिझनेस 7 स्कवेअर येथे सिध्देश पढरे या मुलाचे पार्किंगचे कारणावरुन वाद झाले. त्यानंतर आराेपी निलेश तानाजी पवार (वय- 32,रा. चांदे नांदे, ता.मुळशी,पुणे) याने सिध्देश यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे डाेक्याचे कपाळावर, मानेवर लाेखंडी शस्त्राने मरुन दुखापत केली आहे.याबाबत आराेपी विराेधात सुनिता सर्जेराव पढरे (वय-42) यांनी आराेपी विराेधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
[ad_2]