21 poachers arrested in Pune Forest Department raid in wildlife poaching case | जुन्नर परिसरातील वन्यजीव शिकार प्रकरण: 21 शिकाऱ्यांना अटक, 21 वाघुरी, 10 दुचाकी जप्त; चौघांना 2 दिवसांची पोलिस कोठडी – Pune News

0

[ad_1]

जुन्नर परिसरात हडसर येथील वनकक्ष क्र. १३७ मध्ये मोठ्या संख्येने अज्ञात इसम संशयितरित्या वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत माहिती वनविभाग अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्र जुन्नरच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सु

.

सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक, राजूर एकनाथ बांगर यांना प्राप्त गोपनीय माहितीनुसार हडसर येथील वनकक्ष क्र. १३७ मध्ये २० ते २५ इसम वाघुरीच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने सदर शासकीय राखीव वनात फिरत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी वनरक्षक निमगिरी व वनरक्षक आपटाळे यांच्यासमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सदर आरोपींनी राखीव वन क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी वायुरी लावले असल्याचे तसेच वाघुरीच्या दिशेने वन्यप्राण्यांना हुसकावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर प्रदीप चव्हाण यांना त्याबाबत कळवले असता, चव्हाण यांनी घटनास्थळी अतिरिक्त मनुष्यबळ पाठविले. सदरील सर्व व्यक्तींनी घटनास्थळी वन्यप्राण्यांच्या शिकारीकरिता त्यांनी आणलेल्या एकूण २१ वाघुरी, १० दुचाकी जप्त करण्यात आले.

सदर सर्व २१ जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्याची कबूली दिली आहे. सुराळे येथील आरोपी नीलेश मच्छिंद्र केदारी, रमेश ज्ञानेश्वर केदारी, प्रदीप किसन केदारी व हडसर येथील किसन केशव भले हे तपास कामामध्ये सहकार्य करीत नसल्याने तसेच तपासकामी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने चारही आरोपी यांना बुधवारी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्यातील अन्य १७ आरोपींनी गुन्ह्याबाबतची कबूली दिली असून त्यांना बंध पत्रावर मुक्त करण्यात आलेले आहे.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी स्पष्ट केले की, वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातून पळवून लावणे, त्याचे शिकारीकरिता फासकी/ वाघूर लावणे वा त्याची शिकार करणे इ. कृत्ये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ चे उल्लंघन असून अशा उल्लंघनाकरिता जास्तीत जास्त ७ वर्षे कारावासाची तसेच रु. २५ हजार पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्हा हा अजामीनपात्र तसेच दखलपात्र स्वरूपाचा आहे. यास्तव वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here