येवला प्रतिनिधी : व्हाईस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या येवला तालुका अध्यक्षपदी पत्रकार शब्बीर इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत शब्बीर इनामदार यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली अध्यक्ष निवडीची सुचना पत्रकार अय्युब शाह यांनी मांडली तर गजानन देशमुख यांनी अनुमोदन दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अय्युब शाह यांनी केले तर आभार गजानन देशमुख यांनी मानले व्हाईस ऑफ मिडिया येवला तालुका कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे करण्याचे आली येवला तालुकाध्यक्ष -शब्बीर इनामदार,कार्याध्यक्ष-हितेश दाभाडे, उपाध्यक्ष -दिपक उगले,सागर वाघ, प्रविण खंडांगळे,सरचिटणीस- कौसर सय्यद,खजिनदार- अय्युब शाह,संघटक -सुनील दुनबळे,सहसंघटक -अनिस पटेल,कार्यवाह -विठ्ठल गोसावी याप्रसंगी मोहन कुंभारकर,जाकीर शेख,सचिन शिंदे,अनिल वाघ,शकील शेख,डिजिटल विंग पदाधिकारी,महिला विंग पदाधिकारी उपस्थित होते.