[ad_1]
नांदगाव पेठ येथील जि.प. हायस्कूलच्या समोर मंगळवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात कठोरा गांधी येथील विमा अभिकर्ता प्रवीण विनायकराव वानखडे (वय ४१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ते नांदगाव पेठ येथून आपल्या गावाकडे परत जात अ
.
सामान्य परिस्थितीवर मात करून प्रवीणने अल्पावधीत विमा क्षेत्रात आपला नावलौकिक वाढवला. कामाच्या निमित्ताने प्रवीण दररोज अमरावती किंवा बाहेरगावी जात असे. अशातच मंगळवारीसुद्धा प्रवीण सकाळीच आपल्या दुचाकीने घरून निघाले होते. रात्री नऊ वाजताच्या दरम्यान कठोरा जाणाऱ्या अन्य मित्रांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करत लवकर येण्याची विंनंती केली. मात्र तुम्ही समोर निघा, मी लवकर येतो असे सांगून ते मागाहून एकटेच निघाले. दरम्यान रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठवरून कठोरा गांधी कडे जात असताना जि प. हायस्कूल समोर अचानक त्यांची दुचाकी रस्त्याच्या खाली खड्ड्यात शिरली व संतुलन बिघडल्याने त्यांना प्राणास मुकावे लागले.
रस्त्याने काळोख असल्यामुळे ते कुणालाही दिसले नाही, त्यामुळे कुणी मदतीलाही धावले नाही. दरम्यान रात्रपाळीवरील काही कामगारांनी त्यांना गंभीर अवस्थेत पाहून नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. प्रवीण वानखडे हे विवाहित आहेत. मात्र ते पत्नी व मुलापासून वेगळे राहत होते. आपल्या वृद्ध आईचा सांभाळ करीत होते. त्याच्या अचानक जाण्याने आईचा मोठा आधार हरवला आहे. घटनेची माहिती मिळताच मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली. आज, बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर दुपारी दोन वाजता कठोरा गांधी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय, मित्रपरिवार व गावकरी उपस्थित होते.
[ad_2]