Indrajit Sawant Case And Chhatrapati Shivaji Maharaj Remark | Prashant Koratkar Case Update | प्रशांत कोरटकर प्रकरणाचा तपास रखडला?: आवाजाच्या तपासणीसाठी न्यायवैद्यक विभागाशी पत्रव्यवहारच नाही; पोलिसांच्या भूमिकेवर सवाल – Kolhapur News

0

[ad_1]

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या प्रकरणाचा तपास रखडल्याची चिन्हे आहेत. कोरटकरला जामीन मिळून महिना लोटला तरी पोलिस महासंचालक कार्यालयाने अद्याप कोरटच्या आवाजाची तपासणी करण्यासाठी न्यायवैद्यक विभागाशी क

.

प्रशांत कोरटकरवर इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. गत 25 मार्च रोजी त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्यात त्याला जामीन मंजूर झाला. त्यानंतर आतापर्यंत महिना लोटला तरी या प्रकरणाचा तपास अजून पुढे सरकला नाही.

पोलिस महासंचालक कार्यालयाचे पत्रच नाही

पोलिस या प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या आवाजाची तपासणी करणार होते. यासाठी पोलिस कोठडीत असताना न्यायवैद्यक विभागाच्या अधिकाऱ्याने त्याच्या आवाजाचे नमुणेही घेतले होते. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोरटकरच्या आवाजाचे नमुणे तपासण्यासाठी महासंचलाक कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. पण पोलिस महासंचालक कार्यालयाने या प्रकरणाचा कोणताही पाठपुरावा केला नाही. महासंचालक कार्यालयाने यासंबंधी न्यायवैद्यक विभागाला कोणतेही पत्र दिले नाही. त्यामुळे याविषयी पोलिसांच्या कर्तव्य परायणतेवर सवाल केला जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच प्रशांत कोरटकरचा पोलिस महासंचालक कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्यासोबत फोटो व्हायरल झाले होते. यामुळेही या प्रकरणाच्या तपासावर शंका व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले होते कठोर कारवाईचे संकेत

प्रशांत कोरटकरला अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच केले होते. कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने टेक्निकल ईव्हीडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली, आता पुढची कायदेशीर कारवाई पोलिस करतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही हेच पोलिसांनी या प्रकरणात दाखवून दिलेले आहे. बीएनएसअंतर्गत जी कारवाई असेल ती कारवाई आता त्यांच्यावर होईल, असे ते म्हणाले होते.

कोरटकर शरण आला की त्याला अटक झाली?

उल्लेखनीय बाब म्हणजे प्रशांत कोरटकर पोलिसांना स्वतःहून शरण आला की त्याला अटक केली गेली? याविषयी विरोधकांनी प्रशांत कोरटकरने आधी कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. कोल्हापूर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. पण कोल्हापूर कोर्टात त्याने जी चूक केली होती तीच चूक त्याने उच्च न्यायालयात केली. कोरटकरने उच्च न्यायालयातही अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. पण एका न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वरचे न्यायालयही तो जामीन स्वीकारत नाही. त्याचमुळे कोरटकरसमोर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे तो नाईलाजाने पोलिसांना शरण आल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही असा दावा केला आहे.

दुबईला पळून गेल्याची पसरली होती अफवा

प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. पण अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा अटकेपूर्वी प्रसार माध्यमांमध्ये रंगली होती. दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here