[ad_1]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर वेग आला असतानाच, माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. सध्या अशा कोणत्याही चर्चा पक्षाच
.
यापूर्वी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आले, तर आश्चर्य वाटू नये असे विधान केले होते. यामुळे एकत्रीकरणाच्या शक्यतेवर राजकीय चर्चा तापल्या होत्या. मात्र, अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रत्यक्षात राजकीय पातळीवर कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. अजित पवार गट म्हणतोय की ही माहिती शरद पवार गटातून पेरली जात आहे. पण मी स्पष्टपणे सांगतो की ही चर्चा फक्त मिडियामध्ये आहे.
जवळ या, तुमच्या कानात सांगतो
पत्रकारांनी तुमच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न विचारताच अनिल देशमुख यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले – जवळ या, तुमच्या कानात सांगतो… त्यांच्या या हलक्याफुलक्या प्रतिसादामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली, मात्र त्याचबरोबर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले.
सुप्रिया सुळे आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष
देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी तर राज्यात अजित पवारांनी नेतृत्व करावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. याबाबत विचारले असता अनिल देशमुख म्हणाले की, सुप्रिया सुळे आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेतच, त्या खासदार देखील आहेत. त्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यामुळे काही प्रश्नच नाही. दरम्यान, दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात सध्या कुठलीही चर्चा नाही.
सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपदाची शक्यता
शिवाय, केंद्रात सुप्रिया सुळे यांना कॅबिनेटमंत्रिपद सुद्धा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यास कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो. एकत्र आलेल्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांचे नेतृत्व मान्य करून पुढची वाटचाल करायला हरकत नसल्याचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे. त्यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास केंद्रात आणि राज्यातील राजकारण भक्कम होणार असल्याचेही ते म्हणाले.
सुप्रिया सुळेंकडे देशाची जबाबदारी- रोहित पवार
शरद पवारांनी म्हटले होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे किंवा इतर मंडळी निर्णय घेतील. यावर दोन दिवसांपूर्वी बोलताना रोहित पवार म्हणाले की, यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की शरद पवार साहेब आता कुठेतरी सांगत आहेत की पुढच्या पिढीला आम्ही काही जबाबदारी देणार आहोत. पुढची पिढी याबाबत निर्णय घेतील. सुप्रिया ताई या कार्याध्यक्षा आहेत, त्यांच्याकडे देशाची देखील जबाबदारी तिथे आहे. सुप्रिया ताई जेव्हा बैठक घेतील त्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे मी नक्कीच तुम्हाला सांगेल.
[ad_2]