[ad_1]
बागलाण तालुक्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, डाळिंब, आंबा, भाजीपाला पिकांसह नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. सटाणा आणि नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ना
.
शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे व शहरप्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सटाणा येथील निवासी नायब तहसीलदार सचिन मारके यांच्या दालनात उबाठा सेनेने धाव घेऊन आक्रमक पवित्रा घेतला. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा अजूनही जमिनीतच असून तो सडण्याची शक्यता आहे. मजूर टंचाईमुळे कांदा काढणीला उशीर होत आहे. सकाळी कडक ऊन आणि दुपारी पडणाऱ्या पावसामुळे कांदा खराब होतोय. वादळामुळे अनेकांचे घरांचे पत्रे उडाले असून शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रवींद्र सोनवणे यांनी मांडली. सध्या कांद्याचे दर खालावले असून शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करावी, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनिल सोनवणे, शरद शेवाळे, पप्पू शेवाळे, सुनील गायकवाड, सुरेश पगार आदींनी दिला आहे.
[ad_2]