[ad_1]
दुचाकीवरून खाली पडल्यानंतर आयशर टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्यानं दोन तरुणी जागीच ठार झाल्या. पुणे – बंगळुरू महामार्गावर नारायणवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. करिष्मा उर्फ प्राजक्ता कृष्णा कळसे (रा. रेठरे खुर्द
.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार करिष्मा उर्फ प्राजक्ता कळसे आणि पूजा कु-हाडे या मलकापूर (ता. कराड) येथील डी मार्टमध्ये कामाला होत्या. बुधवारी सायंकाळी मोपेडवरून दोघी वाठार गावाकडे निघाल्या होत्या. नारायणवाडी गावच्या हद्दीत आयशरला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्या महामार्गावर उजव्या बाजूला पडल्या. आयशर टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्यानं त्या जागीच ठार झाल्या.
डी मार्टमध्ये कामाला असलेला मित्र अपघातात जखमी झाला होता. ड्युटी संपल्यानंतर दोघी त्याला भेटण्यासाठी वाठार गावाकडे निघाल्या होत्या. मात्र, वाटेतच काळाने त्यांना गाठलं. अपघाताची माहिती मिळताच कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र मुळीक आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.
दोन्ही तरूणींच्या कुटुबीयांवर मोठा आघात
एकाचवेळी दोन तरूणींचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी कळताच डी मार्टमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली. अवघ्या २२ ते २३ वर्षांच्या वयात त्यांचा मृत्यू झाल्यानं डी मार्टमधील सहकारी कर्मचाऱ्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांच्या मृत्यूचा सहकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. तसेच दोन्ही तरूणींच्या कुटुबीयांवर मोठा आघात झाला आहे.
[ad_2]