Father And Son Died In An Accident In Manmad, Nashik District Today | मनमाडला वडील आणि मुलाचा अपघातात मृत्यू: पुतण्या देखील गंभीररीत्या जखमी; देवदर्शनावरुन परत येतांना काळाचा घाला – Nashik News

0

[ad_1]

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात नगरसोल येथील वडाचा मळा परिसरात राहणारे किशोर ओंकार सोनवणे आणि त्यांचा मुलगा ऋतिक किशोर सोनवणे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे हा देखील होता. तो देखील गंभीर जखमी झाला आ

.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात त्यांचा पुतण्याही गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने मनमाड आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 40 वर्षीय किशोर ओंकार सोनवणे हे त्यांचा मुलगा 11 वर्षीय ऋतिक किशोर सोनवणे आणि पुतण्या 27 वर्षीय रवींद्र बाळू सोनवणे यांना देवदर्शनासाठी घेऊन गेले होते. मात्र परत येत असताना त्यांच्या गाडीला पाठीमागून देणाऱ्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये किशोर आणि ऋतिक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रवींद्र हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तात्काळ आरोपीला अटक करून शिक्षा करावी, ग्रामस्थांची मागणी

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर पिकअप चालकाने मोटरसायकल जवळपास चार किलोमीटर पर्यंत फरफटत नेली. मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून अखेर पिकअपला ताब्यात घेतले. मात्र चालक फरार झाला आहे. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून शिक्षा करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here