[ad_1]
राज्यात 18 लाख बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. सरकारी नोकरदार, व्यापारी, श्रीमंतांकडून स्वस्त धान्याचा गैरवापर करण्यात येत असल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही बांगलादेशी नागरिकांनी काढलेले बोगस रेशनकार्ड रद्द करण्यात
.
दरम्यान राज्यात राबवण्यात येणाऱ्या ई-केवायसी मोहिमेमुळे या अपात्र लाभार्थ्यांवर गंडांतर आले आहे. 5.20 कोटी रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी पूर्ण केली असून, 1.65 कोटी कार्डधारकांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ही मोहिम संपली असली, तरी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत केवायसी सुरू राहणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळतच राहणार आहे.
मुंबईत सर्वाधिक रद्द; ठाणे-पुणे मागेच
राज्यात सर्वाधिक रेशन कार्ड मुंबईत 4.80 लाख, तर ठाण्यात 1.35 लाख रद्द करण्यात आली. पुणे आणि इतर शहरी भागही केवायसीमध्ये मागे असल्याचे चित्र आहे. तुलनेत भंडारा, गोंदिया आणि सातारा हे जिल्हे ई-केवायसीत आघाडीवर आहेत.
बनावट कागदपत्रांमुळे बांग्लादेशीही लाभार्थी!
ई-केवायसीमुळे अनेक बनावट कागदपत्रांवर मिळालेली कार्डं रद्द झाली, ज्याचा फायदा बांगलादेशी नागरिकांनाही मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
‘आहे का तांदूळ?’ म्हणणाऱ्यांचा धान्यावर धावा!
गोरगरीब आणि वंचित गटाला सरकारी अन्नधान्याचा लाभ व्हावा, यासाठी रेशनकार्डद्वारे सरकार दरमहा अन्नधान्य पुरवठा कार्डधारकांना करत असते. मात्र, याचा गैरफायदा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. गलेलठ्ठ पगार, सरकारी नोकरदार, व्यापारी आणि व्यावसायिक लोकांकडे देखील केशरी रेशनकार्ड आहे. त्याआधारे दर महिन्याला ते धान्य उचलतात आणि विविध गृहउद्योग, कुक्कुटपालन तसेच इतर ठिकाणी विक्री करतात. तसेच अनेक बांग्लादेशी नागरिकांचे देखील यात फावले आहे.
ई-केवायसी कशी करावी?
- सर्वप्रथम जवळच्या रेशन दुकानात जा.
- आधार कार्ड (सर्व कुटुंब सदस्यांचे) आणि रेशन कार्ड घ्या.
- आपला मोबाईल नंबर अपडेट केलेला असावा.
- फिंगरप्रिंट किंवा ओटीपीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण (KYC) पूर्ण करावे लागते.
- पूर्ण झाल्यावर तुमच्या कार्डावर “ई-केवायसी पूर्ण” असा स्टेटस दिसेल.
शासन निर्देशानुसार ही प्रक्रिया केवळ अधिकृत रेशन दुकानदारांमार्फत किंवा संबंधित विभागाच्या पोर्टलवरूनच करता येते.
[ad_2]