[ad_1]
नागपुरात 45 लाखांच्या मेफेड्रेनसह अफीम आणि गांजाही पकडलाप्रतिनिधी|नागपूरऑपरेशन ड्रग्ज फ्री सिटी अंतर्गत धडक कारवाई करीत नागपूर पोलिसांनी 50 लाखांच्या मेफेड्रेनसह अफीम आणि गांजाही पकडल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
.
यूनिट क्र. 4 पथकाने हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत 50 लाखांचे मेफेड्रेन पकडले. फ्लॅट नंबर 202, आनंद साई रेसिडेन्सी, खोब्रागडे लेआउट, सर्वश्री नगर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिस हवालदार अभिषेक शनिवारे हेच यातील फिर्यादी आहे.
या प्रकरणी धीरज शाम मलिक (वय 31), शुभम परसराम पेंदोर (वय 28) या दोघांना अटक करण्यात आली. तर अर्पित उके याचा शोध सुरू आहे.या दोघांकडून 45 लाख 60 हजार रूपयांचा 456 ग्राम मेफेड्रान ड्रग्ज जप्त करण्यात आला. या सोबतच रोख 10,800, 20 हजाराचे दोन मोबाईल, एक चार चाकी टाटा नेक्सान गाडी, एक दुचाकी एक्टिवा असा एकूण 54,41,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे यातील आरोपीच्या राहत्या घरी धाड मारून कारवाई करण्यात आली. यातील धीरज शाम मलिक हा यापूर्वीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे.साडेचार लाखांचे अफीम पकडलेयूनिट क्र. 5 पथकाने कपील नगर ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 4 लाख 93 हजार रूपयांचे 2 किलो 469 ग्राम अफीम पकडले. बाबादीप सिंग नगर येथे केलेल्या कारवाईत आरोपी हरमितसिंग दर्शनसिंग गुरम (वय 47) याला अटक करण्यात आली. या प्रकरणी गौतम फरार आहे.
अफीमशिवाय रोख 96,700, 21 हजाराचे दोन मोबाईल, असा एकूण 6,18,550 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सक्करदरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत 9,800 रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुशिल उर्फ पोमा उत्तम वाघमारे (वय 20), अमान कलिम शेख (वय 22), शैलेश किशोर माडेवर (वय 40), असलम उर्फ भुऱ्या दाऊद खान (वय 42) यांना अटक करण्यात आली आहे.
[ad_2]