[ad_1]
हिंगोली जिल्ह्यात गावठीदारुचे गाळप करून विक्री करणाऱ्या तसेच अवैधदारु विक्री करणाऱ्या ९ जणांना एक महिन्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. त्यांच्या हद्दपारीचे आदेश प्रभारी पोलिस अधिक्षक अर्चना पाटील
.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत चोरून लपून अवैधरित्या दारु वाहतूक करून विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. या शिवाय गावठी दारुचे गाळप करून त्याची विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गावातील अवैध दारु बंद करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली. मात्र उत्पादन शुल्क विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गावातील दारु अड्ड्यावर छापे टाकून कारवाई करण्याचे काम पोलिसांनाच करावे लागत आहे.
दरम्यान, जिल्हाभरात गावठी दारुचे गाळप करून विक्री करणारे तसेच अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र गावठी दारु विक्रीचे प्रमाण कमी झाले नाही.
या प्रकारानंतर गावठी दारुचे गाळप करून विक्री करणाऱ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रभारी पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी ठाणेदारांना दिले होते. त्यानुसार हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी ९ जणांचे प्रस्ताव पाठविले होते.
या प्रस्तावानुसार रामु पवार (चिखलवाडी), भारत काळे (हिंगोली), शरद पवार (माळहिवरा), राजू पवार, अ्निल पवार, भारत काळे (रा. कलगाव) यांच्यासह तीन महिलांना हिंगोली जिल्ह्यातून एक महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गावठी दारु गाळप करून विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
[ad_2]