[ad_1]
सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक व मान्यवरांच्या हस्ते पसायदान पुरस्कार, पत्रकाररत्न पुरस्कार, तसेच विविध क्षेत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौ
.
आनंदवन संस्थेच्या ध्यान मंदिरात झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी केले. प्रमुख भाषणात उद्धव महाराजांनी समाजातील संवेदनशील माणसांनी एकत्र येऊन आनंदवन पसायदान संस्थेची स्थापना केली. समाजाला विचार व संस्काराचा प्रसाद दिल्याचे सांगितले. ब्रम्हाकुमारी उषादीदी, राहुल राजाराम कुसळकर व दत्ता हापसे यांना पसायदान पुरस्कार, तर स्व. सोपानराव दरंदले पत्रकाररत्न पुरस्कार सुखदेव फुलारी यांना देण्यात आला. आर्या शिंदे, अतुल शिरसाठ, ऋतुजा कवडे व अभिषेक जंगम यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रसिद्ध व्याख्याते साहित्यिक एन. बी. धुमाळ यांनी आपल्या भाषणात संघर्षमय प्रवास सांगितला. आनंदवनचे अध्यक्ष उदय पालवे, किशोर घावटे, डॉ. तुषार दराडे, अरुण घावटे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमास शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर, साई आदर्शचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, विठ्ठल महाराज खाडे, गोविंद महाराज निमसे, प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, मुळा कारखान्याचे व्यवस्थापक शंकरराव दरंदले, मुळा बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, डॉ. बाबासाहेब शिरसाठ, मारुती मित्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य, ज्ञानेश्वर बेल्हेकर उपस्थित होते. यावेळी गुढी-सजावट व पारायण सोडतचे बक्षीस देण्यात आले. डॉ. संदीप तांबे यांनी सूत्रसंचालन केले. विनायक दरंदले यांनी आभार मानले.
[ad_2]