Cyber crime exposed in Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमधील सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश: शेअर ट्रेडिंग माध्यमातून फसवणूक करणारे चार आरोपी धाराशिव, लातूर, जयपूरमधून जेरबंद – Pune News

0

[ad_1]

पिंपरी चिंचवड परिसरातील एका नागरीकास गुंतवणूक बहाण्याने व्हॉटसअप ग्रुप मध्ये अॅड करुन त्यांना एसएमसी ग्लोबल सिक्युरीटी या कंपनीचे औरारा मॅक्स या बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग अॅपद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवले गेले. त्यानंतर सदर

.

याप्रकरणी अलफहाद आरिफ मोमिण (वय- २७,रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव), अजय पाटील ऊर्फ शिवप्रसाद मल्लिकार्जुन खुदासे (३९,रा. लातूर), सुर्या ऊर्फ राहुलसिंग निर्मलसिंग कर्णावत (रा. झुझुनु, राज्य, राजस्थान), प्रेमशंकर बलदेव बैरागी (रा. भिलवाडा, राजस्थान) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. संबंधित गुन्हयाचा तपास करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे व एसीपी विशाल हिरे यांनी सायबर गुन्हे शाखेचे वपोनि रविकरण नाळे यांना दिले होते.

या गुन्ह्याचा तपास सपोनि प्रविण स्वामी,पोउपनि सागर पोमण, वैभव पाटील यांचे पथक करताना, त्यांनी तक्रारदार यांनी वेगवेगळया बँक खात्याला पैसे ट्रान्सफर केले असल्याने त्या खात्यांचा तपास सुरु केला. त्यावेळी एका आयडीएफसी बँक खात्यावर त्यांनी ५० लाख रुपये पाठविल्याचे दिसून आले. त्याचा तपास केले असता ते बँक खाते हे अल्फा इंडस्ट्रीज या नावाने अलफहाद मोमिण याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार धाराशिव येथे जाऊन त्याला अटक करण्यात आली. त्याच्या तपासात सदर बँक खाते हे त्याने अजय पाटील याचे सांगण्यानुसार काढल्याचे व सदर खात्याचे किट त्याने त्याला दिले असल्याचे सांगितल्याने परत तपास पथक लातूरला जाऊन त्यांनी अजय पाटील व शिवप्रसाद खुदासे याला अटक केली.

त्यानंतर गुन्ह्यात वापरलेले बँकेचे कीट तांत्रिक विश्लेषण आधारे शोधल्यावर राहुलसिंग कर्णावत या राजस्थान मधील आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला. परंतु तो त्याचे राहत्या पत्त्यावर मिळून येत नसल्याने सपोनि प्रवीण स्वामी, पोउपनि सागर पोमण यांचे पथकाने तांत्रिक विश्लेषणद्वारे त्याचा शोध घेऊन सदर आरोपीस सापळा रचून जयपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल तपास केल्यावर त्याने आरोपी प्रेमशंकर बैरागी सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यास देखील अटक करण्यात आली.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here