[ad_1]
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने राबवण्यात येत असलेल्या योजनेच्या जनजागृतीच्या प्रचार रथाचा शुभारंभ मंगळवारी (दि. २०) शहरातील एकात्मता चौकात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श
.
जैन संघटनेने सहकार्य केल्यास शहराला सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील गाळ काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जमीन सुपीक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धरणातील हा गाळ उपलब्ध होईल, त्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी चौधरी यांनी याप्रसंगी केले. महाराष्ट्र शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार नाना खोलीकरण व वृद्धीकरण ही मोहीम सर्वत्र मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. या अंतर्गत धरण तलावातील आणि नाल्यातील गाळ काढून तो परिसरातील शेतकऱ्यांना मोफत दिला जातो. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते. भारतीय संघ जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाची ही योजना गावागावात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाधिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने चित्र रथ तयार करण्यात आला आहे. एकात्मता चौकात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाच्या प्रचार रथाचा शुभारंभ पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी श्रीफळ वाढवून केला. यावेळी नामको बँकेचे उपाध्यक्ष सुभाष नहार, डॉ. सुनील बागरेचा, युवा उद्योजक उमेश ललवाणी, उमेश गांधी, सादिक तांबोळी आदींसह जैन बांधव संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नाला तलावाचा गाळ काढून शेतकऱ्यांना मोफत दिला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, धरणातील तलावातील पाण्याची क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर वाढते. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी या योजनेचा लाभ घेऊन तलावांमधील गाळ काढण्यासाठी आणि नाला खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
[ad_2]