road and streets named after cricketer sachin tendulkar sunil gavaskar virat kohli kapil dev

0

[ad_1]

Cricket : क्रिकेट हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ समजला जातो. क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली असली तरी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज सारख्या देशांमध्ये सुद्धा हा खेळ खूप लोकप्रिय आहे. या खेळाने देशाला अनेक स्टार खेळाडू दिले ज्यांनी आपल्या कामगिरीने फक्त देशातच नाही तर जगभरात प्रभाव पाडला. 

काहीच दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या नावाने वानखेडे स्टेडियमवर एक स्टॅन्ड तयार करण्यात आला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर इत्यादी अनेक क्रिकेटर्सच्या नावाने स्टॅन्ड बनवण्यात आले आहेत. पण तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की, क्रिकेटर्सच्या नावाने स्टॅन्डच नाही तर जगातील शहरांमध्ये रस्ते आणि मार्ग सुद्धा आहेत. 

‘तेंडुलकर चौक’ : मुंबई 

‘गॉड ऑफ क्रिकेट’ अशी ओळख असणारा सचिन तेंडुलकर याच नाव मुंबईतील एका प्रमुख चौकाला देण्यात आलं आहे, ज्याला ‘तेंडुलकर चौक’ असं म्हटलं जातं. 

‘कपिल देव मार्ग’ : नवी दिल्ली

भारताला पहिला आयसीसी वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांचं नाव दिल्लीच्या एका रस्त्याला देण्यात आलं आहे. या रस्त्याला ‘कपिल देव मार्ग’ असं देण्यात आलं आहे. 

‘सुनील गावसकर मार्ग’ : पुणे 

भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांचं देखील भरतोय क्रिकेटला मोठं योगदान राहील आहे. पुण्यातील एका रस्त्याला सुनील गावसकर यांचं नाव देण्यात आले असून त्याला ‘सुनील गावसकर मार्ग’ असं म्हणतात. 

हेही वाचा : ‘तो पेल दुंगा’, अंपायरच्या एका निर्णयानंतर कुलदीप यादवचा थयथयाट; DC VS GT सामन्यात नेमकं काय घडलं?

‘जावेद मियांदाद रोड’ : कराची 

जावेद मियांदाद हे पाकिस्तानचे माजी क्रिकेटर असून ते सध्या पाकिस्तान संघाचे कोच सुद्धा आहेत. जावेद मियांदाद यांनी पाकिस्तान क्रिकेट संघासाठी उत्तम कामगिरी केली. कराची येथील एका रस्त्याला जावेद मियांदाद रोड यांचं नाव देण्यात आलं असून त्याला ‘जावेद मियांदाद रोड’ म्हणून ओळखलं जातं. 

‘शाहिद अफरीदी रोड’ :  कोहाट

शाहिद अफरीदी हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. स्टार ऑलराउंडर असलेला शाहिद अफरीदी याच नाव पाकिस्तानच्या कोहाट शहरातील एका रस्त्याला देण्यात आलं असून त्याला ‘शाहिद अफरीदी रोड’ म्हणून ओळखतात. 

‘कोहली क्रेसेंट’ : ऑस्ट्रेलिया 

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील रस्त्याचे नाव भारतीय फलंदाज विराट कोहली याच्या नावावर आहे. मेलबर्नच्या उपनगराच्या रॉकबँकमध्ये एका रस्त्याला विराट कोहलीचे नाव देण्यात आलं असून त्याला ‘कोहली क्रेसेंट’ असं म्हणतात. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here