Pedestrian dies after hit drunk rickshaw driver pune crime news | खडकवासला धरण परिसरात अपघात: मद्यधुंद रिक्षाचालकाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

0

[ad_1]

पुणे शहराजवळ खडकवासला धरण परिसरात एका भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

.

संतोष माधव मते (वय ४७, रा. खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक राेहित दत्तात्रय चव्हाण (रा. खडकवाला,पुणे)असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अविनाश माधव मते (वय ४५, रा. खडकवासला,पुणे) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मते हे खडकवासला धरण परिसरातून जात हाेते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव रिक्षाने त्यांना जोरात धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मते यांचा उपचारांदरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. मते यांचे भाऊ अविनाश यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक रोहित चव्हाण याने मद्यप्राशन करुन अपघात केल्याचे मते यांनी फिर्यादीत सांगितले आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन यादव पुढील तपास करत आहेत.

विजेचा धक्का बसून दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे शहरातील वारजे परिसरात विजेचा धक्का बसून दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घरासमोर असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने त्याला जोरदार शॉक बसला आहे.मृत मुलाचे नाव मयंक उर्फ दादु प्रदीप आडागळे (वय 10) असे आहे.रामनगर परिसरातील हा मुलगा रहिवासी आहे.संबंधित मृतदेह माई मंगेशकर रुग्णालयात घटने नंतर नेण्यात आला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here