Nitesh Rane Acquitted in 2017 Malvan Fish-Throwing Case Involving 32 Others | मालवणमधील बांगडा मासोळी फेक प्रकरण: मंत्री नीतेश राणेंसह 32 जणांना न्यायालयाकडून मोठा दिलासा, सर्वांची निर्दोष मुक्तता – Mumbai News

0

[ad_1]

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री नीतेश राणे यांनी मालवण मत्स्य अधिकाऱ्यांवर बांगडा फेकला होता. 2017 सालच्या या ‘बांगडा फेक’ प्रकरणात राज्याचे मत्स्य विकास व बंदरे मंत्री नीतेश राणे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणातील त्यांच्यासह 32 जणांना जिल

.

सदरील बांगडा फेक प्रकरण हे 6 जुलै 2017 रोजीचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांच्या समस्या आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी नीतेश राणे यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयावर धडक देत आक्रमक पवित्रा घेतला होता. सागरी हद्दीत अनधिकृतरित्या सुरू असलेल्या पर्ससीन नेट मासेमारीविरोधात मच्छीमार आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर राणेंच्या नेतृत्वाखाली शेकडो मच्छीमारांनी मालवणमधील सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयात धडक दिली. मासेमारी बंदी असताना सुरू असलेली मासेमारी दाखवण्यासाठी बांगडा मासळीची टोपली मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या टेबलवर ओतून शासनाचा व मत्स्य विभागाचा निषेध केला होता.

राणेंनी स्पष्ट शब्दांत मत्स्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. “तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवत नाही, पैसे खाता, म्हणून आम्हाला इथपर्यंत यावे लागले,” असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला होता. पण मत्स्य आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार राणे यांनी टेबलावरील बांगडा आयुक्तांच्या अंगावर फेकला.

सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक प्रदीप वस्त यांनी लेखी आश्वासन दिले होते की, मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई केली जाईल. या लेखी आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास कायदा हातात घेतला जाईल तसेच संबंधित अधिकाऱ्यावरच कारवाई करून त्यांच्याकडूनच दंड वसूल करू असे स्पष्ट करत आमदार राणे यांनी हे आंदोलन थांबविले होते.

या घटनेनंतर नीतेश राणे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मत्स्य आयुक्तांना बांगडा फेकून मारल्याच्या प्रकरणी मालवण पोलिसांनी नीतेश राणे यांना अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता. न्यायालयाने आता नीतेश राणे यांच्यासह 32 जणांना निर्दोष मुक्त केले आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here