[ad_1]
गेल्या २१ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे चार महिन्यांत प्रथमच शहराचे तापमान ११ अंशांनी घसरले. डिसेंबर, जानेवारीमध्ये शहराचे तापमान २९ ते ३२ अंशावर होते. यंदा मात्र उष्णतेचा तीव्र महिना असलेल्या मे महिन्यात चक्क शहराचे तापमा
.
शहरासह जिल्ह्यात ५ मेपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस सुरू आहे. यंदा मे महिन्याच्या १९ दिवसांमध्ये जिल्ह्यात ४१ मिमी पावसाची नोंद झाली. दरवर्षी २१ ते २५ मे दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या १९ दिवसांत शहरासह जिल्ह्याच्या बहुतेक भागात अवकाळी पाऊस बरसला आहे. यंदा तीव्र उष्णतेचा महिना असलेल्या मे महिन्यातच अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट होताना दिसत आहे. यंदा १ ते ३१ डिसेंबरदरम्यान शहराचे कमाल तापमान २९ ते ३० अंशावर होते. जानेवारीत ३० ते ३३ अंशावर शहराचे कमाल तापमान होते. फेब्रुवारीत २८ ते ३२ कमाल तापमान नोंदवण्यात आले होते. मार्च महिन्यात ३४ ते ३६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले होते. एप्रिलमध्ये शहराचे तापमान ४१ ते ४३ अंशावर गेले होते. डिसेंबर ते एप्रिलदरम्यान सर्वाधिक ४३ अंशावर गेलेले तापमान सोमवारी तब्बल ११ अंशांनी घटले होते. चार महिन्यातील सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद सोमवारी झाली.
शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात पुढच्या तीन दिवसांत पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः शुक्रवारी (२३ मे) जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसामुळे प्रशासनाने दिला आहे.
[ad_2]