अहिल्यानगर प्रतिनिधी : अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.तर त्यांच्याजागी सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहे. आज राज्य सरकारने याबाबत माहिती दिली आहे. ते रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, अधीक्षक घार्गे (SP Somnath Gharge) यांनी यापूर्वी श्रीरामपूर (Shrirampur) उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. गृह विभागाने राज्यातील 21 पोलीस अधीक्षकांच्या बदलीबाबतचे आदेश गुरूवारी (22 मे) काढले आहे.