पुणे प्रतिनिधी : राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या सुनेच्या मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर पक्षाने ही कारवाई केली आहे.
पुण्यातील भुकूम येथे 16 मे रोजी वैष्णवी हगवणे (वय 23) यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला.
एफआयआरनुसार, वैष्णवीच्या पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.