तीन बायकांचा दादला गोमातेवर करतोय लैंगिक अत्याचार 

0

राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथिल तरुणावर गुन्हा दाखल 

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी, 

          सध्याच्या कलीयुगात काय होईल आणि कोण काय करेल याचा भरवसा नाही. असे जुने जानकार मंडळी कायमच सांगत असतात. तीन बायकांचा दादला गोमाता समजल्या जाणाऱ्या गाई व शेळीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे.राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे परिसरातील हा विचित्र प्रकार घडला आहे. 

           राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे परिसरातील गिते वस्ती येथे आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे, वय ४५ वर्षे हा वासनांध इसम राहत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो परिसरात असलेल्या गाई व शेळ्यांवर लैंगिक अत्याचार करत आहे. परिसरातील अनेक लोकांनी त्याला समज दिली. मात्र त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. वासनांध तरुण तीन बायकांचा दादला आहे. तीनही बायका त्याला सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. वासनांध गणेश कांगळे जेथे राहतो त्याच्या शेजारीच राजेंद्र फ्रान्सिस साळवे, वय ५० वर्षे, हे त्यांच्या कुटुंबासह राहत असुन त्यांनी काही कालवड पाळल्या आहेत.

दि. १७ मे २०२५ रोजी रात्री २.३० वाजे दरम्यान राजेंद्र साळवे हे घरात झोपलेले असताना त्यांना त्यांच्या गाईचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी घरा बाहेर येऊन पाहिले असता आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा स्वतःचे कपडे काढुन गोठ्यातील चार पाच महिन्यांच्या गाईचे कालवडी सोबत लैंगिक अत्याचार करताना दिसला. त्यावेळी त्याला चांगलाच चोप दिला. त्यावेळी मी नशेत असल्याने माझ्याकडून सदर कृत्य झाले. अशी कबूली दिली. आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा वासनांध इसम आहे. परिसरात अनेक छोट्या मुली व महिला राहतात. भविष्यात या वासनांध गणेश कांगळे याने एखादी महिला किंवा मुलीवर अत्याचार केलातर विपरीत घटना घडू शकते. 

          त्यामुळे राजेंद्र फ्रान्सिस साळवे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे, वय, ४५ वर्षे रा. गितेवस्ती चिंचविहीरे, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ५८९/२०२५ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११ (१) (फस्ट) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here