18 out of 725 contestants in Pune Idol competition reach finals | पुणे आयडॉल स्पर्धेत 725 स्पर्धकांमधून 18 जण अंतिम फेरीत: संगीत ऐकल्यावर एक नवचैतन्य निर्माण होते – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भावना – Pune News

0

[ad_1]

संगीत म्हणजे आनंदाचा एक मेळा.कोणतेही संगीत ऐकल्यावर लगेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. एक नवचैतन्य निर्माण होते. गाण्याचा छंद जोपासून अनेक पुणेकरांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. पुणेकरांच्या गायनाच्या छंदाला गेली 23 वर्

.

माजी आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धा. या स्पर्धेची महाअंतिम फेरी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न झाली.यावेळी कृषिमंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे पुणे शहाराध्यक्ष धीरज घाटे, संयोजक सनी विनायक निम्हण आदि मान्यवर उपस्थित होते. पुणे आयडॉल स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व गायन कला जोपासणाऱ्या व्यक्तींचा ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो, यंदा डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पुढे बोलताना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, पुणे आयडॉलच्या माध्यमातून पुणे शहरातील नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची इच्छा दिवंगत नेते विनायकराव निम्हण यांची होती. त्यानुसार गेली अनेक वर्ष ही स्पर्धा सुरू आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, एखादा उपक्रम सुरु करणे सोपे असते. मात्र तो सातत्याने आणि तेव्हढ्याच दिमाखात सुरू ठेवणे कठीण आहे. परंतु स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांनी पुणे आयडॉल ही स्पर्धा सुरू केली अन् गेल्या 23 वर्षांपासून ही अशीच सुरू आहे. सनी निम्हण यांनी त्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा दोन्ही घेतला आहे. या स्पर्धेत पुणे शहरात व्यतिरिक्त इतर शहर आणि राज्यातून देखील स्पर्धक आलेले आहेत. यातच या स्पर्धेचे यश आहे.

धीरज घाटे म्हणाले, सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. येथे गेली 23 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे.

प्रास्ताविक पर भाषणात सनी निम्हण म्हणाले, पुणे आयडॉल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 725 स्पर्धकांमधून 18 स्पर्धक निवडण्यात आले. त्यांची निवड करताना परीक्षकांचाच कस लागला आहे. पुणे आयडॉल ही केवळ स्पर्धा नसून आपले गायन कौशल्य सादर करण्याचे एक महत्वाचे व्यासपीठ बनले आहे.पुणे आयडॉल स्पर्धेतील चारही गटाच्या प्रथम विजेत्यास 15 हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here