Manikrao Kokate Comments on Chhagan Bhujbal Becoming Prime Minister | छगन भुजबळ हे पंतप्रधान झाले तरी आम्ही स्वागत करू: उपमुख्यमंत्री होण्याच्या चर्चेवर माणिकराव कोकाटेंचा चिमटा; रोहित पवारांनाही लगावला टोला – Solapur News

0

[ad_1]

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पद जाण्याची देखील चर्चा सुरू आहे. तर मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री देखील होतील असे भाजप न

.

छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्रीच काय ते पंतप्रधान झाले तरी आम्ही त्याचे स्वागत करू, असा उपरोधक टोला माणिकराव कोकाटे यांनी लगावला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाशिकच्या पालकमंत्री पदावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही कोणीही कुठलीही इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे मी काही भाष्य करत नाही. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या कोट घालण्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती. यावर देखील माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवार यांनी केलेल्या शेरेबाजीवर बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले, मी आज नाहीतर पहिल्यापासून कोट घालतो. माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी देखील कोट घालण्या लायक व्हावा, त्याची आर्थिक परिस्थिती व राहणीमान सुधारावे ही माझी इच्छा आहे. समजा रोहित पवारांना असे वाटत असेल की, मला कोट नाही, शेतकऱ्यांना कोट नाही आणि कृषिमंत्रीच कोट घालतात तर आम्ही त्यांनाही कोट देऊ, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सरासरी 120 मिमी पाऊस झाला असल्याने सर्वच ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here