महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्याजवळचा थरार कॅमेरात कैद
विशेष प्रतिनिधी,चिखलदरा : पावसाळ्यामध्ये रस्त्यावर वाहने सावकाश चालवा असं अनेकदा पोलिसांकडून जनजागृतीदरम्यान सांगितलं जातं. पावसाळी सहलींसाठी निसर्गरम्य ठिकाणांवर होणारी गर्दी लक्षात घेता असा पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक आणि पोलीसांची सुरक्षाही पुरवली जाते.
मात्र अशा ठिकाणी अनेकदा अती उत्साही पर्यटक जीवाशी खेळ करावा असे काही प्रकार करतात. असाच एक प्रकार पावसाचं आगमन झाल्याचं पाहिल्याच दिवशी अमरावतीमध्ये घडला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधील चिखलदऱ्यामध्ये एक कार पाचशे फूट खोल दरीत कोसळताना थोडक्यात बचावली. अचानक आलेल्या पावसाने माती खचल्याने ही कार डोंगरमाथ्यावरुन दरीच्या बाजूला सरकली. टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची ही कार पाचशे फूट खोल दरीत कोसळणार असं वाटत असतानाच ही कार डोंगरमाध्यावर अर्धवट अवस्थेत अडकून पडली.
सुदैवाने या कारमधील चारही युवकांचे प्राण वाचले आहे. ही डोंगरमाध्यावर अर्थवट दरीत कलंडलेली आणि अर्धवट वर असलेली कार पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. या कारमधील लोकांचं काय झालं याबद्दल ही कार पाहणारा प्रत्येकजण विचारत होता. मात्र कोणाचीही जिवीतहानी झाली हे ऐकल्यानंतर बघ्यांचाही जीव भांड्यात पडला.