साताऱ्यात रमाबाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन  !

0

सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ माता रमाई यांच्या ९० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ऍड.विजयानंद कांबळे होते.

     प्रथमतः डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, सरचिटणीस गणेश कारंडे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,विलास सावळे,विलास कांबळे, प्रशिक कांबळे, शेखर दणाने,रामदास वाघमारे,सुभाष सोनावणे,विश्वास सावंत,अंकुश धाइंजे आदी मान्यवर उपस्थीत होते.

 

 नांदण नांदण ….या गीताने भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष आबा दणाने यांनी आदरांजली अर्पण केली.

    सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे बी.एल.माने यांनी अभिवादनपर घटना सांगितली. “एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामानिमित्त जायचे होते. पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे ? म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.ते वराळे काका धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई यांनी वराळे काकांना विचारले,दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत ? खेळायला आवारात का आली नाहीत ? त्यावेळी वराळे म्हणाले, ती लहान मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत. कारण, वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही. ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.

वराळे यांनी अगदी कंठ दाटून ते म्हणाले.त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोलीमध्ये जातात आणि रडत बसतात. कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देऊन म्हणाल्या, तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात. त्यावेळी पोटभरून जेवण मुले करतात. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते. तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना “रमाआई” म्हणून बोलायला लागतात.त्या क्षणापासून रमाबाई ही माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here