येवला प्रतिनिधी :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला येथे त्यागमूर्ती माता रमाई महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. अँड.आरती खरात अध्यक्षस्थानी होत्या.भारतीय अकॅडमीच्या विध्यार्थी,विद्यार्थ्यांनीनी ह्या वेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय अकॅडमीचे संचालक प्रा.राजरत्न वाहुळ सर यांनी केले.ह्यावेळी स्वाती औताडे, शितल वाहुळ,साक्षी गायकवाड, सुप्रिया कुऱ्हाडे,प्रांजल पवार,तेजस्विनी गुंजाळ,ऋतुजा राऊत, भाग्यश्री वाघ,आदिती मोरे,विशाल गरुड,सार्थक शिरसाट,ओम शिरसाट ,प्रवीण गायकवाड, कुणाल जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन गायत्री खोकले यांनी केले व आभार इंजि.अक्षय गरुड यांनी मानले.