प्रसारमाध्यमामुळे धम्म प्रचार-प्रसार करण्यासाठी झळाळी मिळाली : अशोक भालेराव

0

सातारा : अकेला चना कोई फोड नही सकता …. या न्यायाने धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी अनिल वीर यांनी प्रसार माध्यमाद्वारे झळाळी आणली. असे प्रतिपादन जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक भालेराव यांनी केले.  बंधुत्व प्रतिष्ठानचे धम्मरत्न पुरस्कार नुकतेच मान्यवरांच्या  हस्ते प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी भालेराव बोलत होते. अध्यक्षस्थानी लेखक सुदर्शन इंगळे होते.मंचावर कविवर्य डॉ.आनंद साठे,डॉ.आर.जी. कांबळे,रमेश इंजे,बी.एल.माने, ऍड.विलास वहागावकर, दादासाहेब ओव्हाळ,अनिल वीर आदी मान्यवर उपस्थीत होते. सदरचे पुरस्कार लता अशोक भालेराव या दाम्पत्तासह अविनाश बारसिंग,रुपेश सावंत (दाम्पत्य), ऍड. विजयानंद कांबळे,धम्मचारी संघादित्य आदींना प्रदान करण्यात आले. तेव्हा भालेराव सत्कारास उत्तर देताना प्रातिनिधिक म्हणून बोलत होते.

         

अशोक भालेराव म्हणाले, “बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी जन्मभूमी पाटण ते कर्मभूमी महाबळेश्वर पर्यंत व्हाया भिमाईभूमी सातारा याठिकाणी धम्म चळवळ वाढविण्यासाठी साह्य केले आहे.अर्थात, जिल्हा व बाहेर सर्वत्र पत्रकार म्हणुनही निष्ठेने वीरसरांची अनोखी अशी छाप पडलेली आहे.” प्रकाश काशीळकर,किशोर धरपडे व सुनील माने यांनी सुत्रसंचालनासह परिचय व मानपत्राचा वाचन करून कार्यक्रमाची उंची वाढवली. अनिल वीर यांनी आभार मानले.

 

 सदरच्या कार्यक्रमास प्रा.रमेश मस्के,प्रा.डॉ.विलास खंडाईत, प्राचार्य डॉ.अरुण गाडे,प्रदीप मस्के,चंद्रकांत खंडाईत व त्यांचे सर्व सहकारी,डॉ.शाहीर प्रकाश फरांदे, विलासराव कांबळे,वामन गंगावणे,डॉ.माळगे,सुभाष सोनावणे,संजय बोंडे, अशोक भोसले,अशोक कांबळे,डी.एस. भोसले,मंगेश डावरे,महादेव मोरे,दिलीप-महेंद्र भोसले सर्व प्रकारचे पुरस्कार विजेते,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here