महाबळेश्वर/सातारा : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशानुसार महाबळेश्वर तालुकास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक तहसीलदार तेजस्वीनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत तालुका कृषी अधिकारी यांना तसेच मनुष्य हानी पशुधन हानी तसेच घरपडझड नुकसाना झालेस त्याबाबतचा पंचनामा संबंधित विभागाने तात्काळ करुन अहवाल सादर करणेबाबत सूचना तहसीलदार श्रीमती पाटील यांनी केल्या.