Fatal accident on Hingoli to Aundha Nagnath road | हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर भीषण अपघात: येहळेगाव सोळंके शिवारात भरधाव कार-दुचाकीची धडक, एक ठार एक जखमी – Hingoli News

0

[ad_1]

हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर येहळेगाव सोळंके शिवारात भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या् अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी ता. २९ दुपारी घडली आहे. या अपघातानंतर कार चालकाने वाहन घटनास्थळी सोडून पळ काढला.

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील नामदेव वाघ (४४) हे त्यांचे नातेवाईक शिवाजी वाघ (रा. हिरडगाव, ता. वसमत) यांच्या सोबत दुचाकी वाहनावर हिंगोली येथे आले होते. दुपारच्या सुमारास काम आटोपून ते गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर येहळेगाव सोळंके शिवारात त्यांचे दुचाकी वाहन आले असतांना औंढा नागनाथकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच-२०-जीसी-८००८) त्यांच्या दुचाकीला समोरा समोर धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील नामदेव व शिवाजी गंभीर जखमी झाले तर दुचाकी वाहनाचा चुराडा झाला. अपघातानंतर कार चालकाने कार घटनास्थळी सोडून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अफसर पठाण, शेख खुद्दूस, जमादार कालवे, रवीकांत हरकाळ, संदीप टाक यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र नामदेव यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर गंभीर जखमी असलेल्या शिवाजी यांच्यावर प्राथमिक उपचार करून हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात हलविले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच गंभीर होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. तर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी कार चालकाचा शोध सुरु केला आहे.

एसटी बस आणि टीप्परचा भीषण अपघात

नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव टिप्पर चालकानं अचानक ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून आलेल्या बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि टिप्परला जबर धडक दिली. या भीषण अपघातात बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला असून आणि बस चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेला प्रवासी यात गंभीर जखमी झाला. ही घटना भंडारा – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खरबी नाका येथील चिखली फाट्यावर रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त बस ही छत्तीसगडच्या राजनांदगाव इथून प्रवाशांसह भंडारा मार्गे नागपूरकडं निघाली होती.

या बस मध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात १ प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आलं. तर ६१ प्रवाशांपैकी ३० प्रवासी किरकोळ जखमी असून उर्वरित प्रवाशी सुखरूप बचावलेत. प्रकाश शेंद्रे (६२) असं गंभीर जखमी प्रवाशाचं नावं आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी फरार टिप्पर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here