[ad_1]
रणजितसिंह मोहिते पाटील ही एक लाचार प्रवृत्ती आहे. त्यांचा भाजपमधील विषय संपला आहे. कदाचित एखाद्याला हकालपट्टी करून कशाला मोठे करायचे असा विचार पक्ष करत असेल, अशा शब्दांत भाजप नेते राम सातपुते यांनी शुक्रवारी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर निश
.
भाजप प्रदेशाध्यक्ष नुकतेच सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरील कारवाईविषयी प्रश्न करण्यात आला होता. त्यावेळी मोहिते पाटलांनी आपली मान खाली घातली होती. राम सातपुते यांनी या घटनाक्रमावरून मोहिते पाटलांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मान खाली घालण्याच्या कृतीवर मी भाष्य करणार नाही. मुळात ती लाचार प्रवृत्ती आहे. त्यावर मी काय बोलणार? आता त्यांचा भाजपमधील विषय संपला आहे.
एखाद्याला हकालपट्टी करून कशाला मोठे करायचे, हा विचार कदाचित भाजप करत असेल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहिते पाटलांविषयीचा अहवाल पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवल्याचे मला सांगितले आहे, असे ते म्हणाले.
मोहितेंना भाजपच्या जिवावर आमदारकी मिळाली
राम सातपुते पुढे म्हणाले, रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपच्या जिवावर आमदारकी भेटली होती. त्यांची आमदारी काढायची असेल किंवा त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर त्याविषयी एक शिस्तपालन समिती असते. त्यानुसार मोहिते पाटलांवरील कारवाईचा विषय केंद्रीय शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आला आहे. पण त्यांनी भाजपला काय दिले? त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? ते कशा पद्धतीने गद्दारी करू शकतात? हे आता भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळे भाजप येत्या काळात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करेल आणि ती केलीच पाहिजे असे माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे.
आम्ही दुःख कुरवाळत बसत नाही
मोहिते पाटील आतापर्यंत आम्ही असे, आम्ही तसे असे म्हणत होते. पण आम्ही त्यांच्या नाकाखालून 1 लाख 8 हजार मते मिळवली. त्यामुळे माळशिरसच्या जनतेला कोण कामाचा माणूस हे समजले आहे. भविष्यातही आम्ही संघर्ष करत राहू. राम सातपुते हा एखाद्या पराभवाने किंवा दुःख कुरवाळत बसत नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. याऊल मोहिते पाटील एक लाचार प्रवृत्ती आहे. राम सातपुते अशा प्रवृत्ती व विकृतीच्या विरोधात काय लढा देत राहील. मुळात मी माझी ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवू दिली आहे, असे ते म्हणाले.
हे ही वाचा…
अरे आतमध्ये कुणाला जाऊ देऊ नको:त्या दायमीच्या पेशंटला मारून टाक की; कोरोना रुग्णाला मारण्याची डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल
लातूर – कोरोना काळात (2020-2022) जगभरात अभूतपूर्व आरोग्य संकट निर्माण झाले. भारतातही कोविड-19 च्या साथीमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना, रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, औषधे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवला. यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले. पण अशा प्रतिकुल परिस्थितीतही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या अतुलनिय निष्ठेच्या जोरावर लाखो रुग्णांचे प्राण वाचवले. पण याच काळात डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या काही घटनाही घडल्या.
अशीच एक घटना लातूरच्या उदगीर येथे घडली आहे. त्यात एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला कोरोना रुग्णाला चक्क मारून टाकण्याचा सल्ला देत आहे. या घटनेची एक ऑडिओ क्लिप आता चांगलीच व्हायरल झाली आहे. वाचा सविस्तर
[ad_2]