Congress Leader’s Brother Murdered in Akola by Bail-Released Criminal | अकोल्यात काँग्रेस नेत्याच्या भावाचा खून: जामिनावर सुटलेल्या गुंडाकडाकडून निवृत्त अभियंत्याची निर्घृण हत्या, आरोपीला केली अटक – Akola News

0

[ad_1]

अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता संजय कौसल यांची अज्ञात कारणातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अकोला शहरातील रणपिसे नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी महेंद्र पवार या व्यक्तीला अटक केली आहे. महेंद्र पवार याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. तो याआधी देखील गंभीर गुन्ह्यात सहभागी राहिलेला आहे. त्याने याआधी एका व्यक्तीवर गंभीर हल्ला केला होता. या प्रकरणात त्याला तुरुंगवासही झाला होता. आता तो सध्या जामिनावर बाहेर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारने धारदार लोखंडी टिकासने संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर वार करत त्यांचा जागीच खून केला.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलिसांचा तपास सुरू आहे. नवे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक अकोल्यात रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ही हत्या झाली आहे.

जुन्या वादातून हत्या झाल्याची शक्यता

या हत्येमागे काही वर्षांपूर्वीचा वैयक्तिक वाद असल्याची प्राथमिक चर्चा आहे. मारेकरी महेंद्र पवार आणि संजय कौसल हे दोघेही रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवरमध्ये राहतात. ही घटना अकोल्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार खळबळ उडवणारी ठरली असून, काँग्रेस नेते विजय कौसल यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे अकोल्याचे नवे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, कारण त्यांनी अकोला पोलिस अधीक्षकाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ही खळबळजनक घटना घडली.

हे ही वाचा…

चंद्रपूरमध्ये हायवाने 10 वाहनांना उडवले:चालकाला फिट आल्याने घडला अपघात, पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव हायवाने 10 वाहनांना धडक दिली. तुकूम ते ताडोबा रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. हायवा चालवत असलेल्या चालकाला अचानक फिट आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली. या अनियंत्रित वाहनाने तब्बल दहा वाहनांना देखील चिरडले. या भीषण अपघातात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. पूर्ण बातमी वाचा…

उद्धव ठाकरेंच्या पक्षात 8 दिवसांत मोठा भूकंप:संपूर्ण पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या पक्षात पुढील 8 दिवसांत मोठा भूकंप होईल. त्यानंतर त्या पक्षात कोण राहणार व कोण राहणार नाही हे स्पष्ट होईल, असे सूचक विधान भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ माजली आहे. पूर्ण बातमी वाचा…

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here