[ad_1]
राज्य शासनाने अवकाळी पावसाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानी संदर्भात अद्याप कोणतीही भरपाई दिलेली नाही. यावेळी सरकारने दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचे निश्चित केले आहे. हा निकष अन्यायकारक आहे. शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई मिळावी अशी मा
.
सातारा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, अर्चना देशमुख, भारती काळंगे, राजकुमार पाटील, विजयराव बोबडे, गोरखनाथ नलावडे इत्यादी उपस्थित होते.
नेमके काय म्हणाले शशिकांत शिंदे?
आमदार शिंदे म्हणाले, मागील वर्षी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची व पीक विमा रक्कम आजही मिळालेली नाही. मे महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. शासनाने भरपाई देण्यासाठी तयार केलेले निकष अन्याय करणारे नसावेत. तसेच भरपाई तातडीने मिळण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. तरीही मंत्र्यांची आणि आमदारांची भाषा योग्य पद्धतीने दिसत नाही.
आमच्या मते शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत मिळायला हवी. जिल्ह्यातील पंचनामे कशा पद्धतीने झालेत याची माहिती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणार आहोत. पंचनामे पूर्ण झालेत का? किती दिवसात भरपाईची रक्कम मिळणार? हे शासनाने जाहीर करायला हवे, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली.
शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार
धोम कालव्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर पन्नास कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून किती दुरुस्ती झाली हे स्पष्ट केलेले नाही. या विरोधात आम्ही अधिवेशनात हक्क भंग प्रस्ताव आणणार आहोत व शेतकऱ्यांना भरपाई देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
आगामी सर्व निवडणुका ताकतीने लढणार
जिल्ह्यात पक्ष संघटनेची पुनर्बांधणी केली जाणार आहे. नुकतेच चार तालुक्यांचे दौरे पूर्ण केले असून शशिकांत शिंदे म्हणाले सर्व जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना घेऊन संघटना बांधणी करणार आहोत. जूनमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील. आगामी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होऊन ताकतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाईल. महाविकास आघाडी होणे न होणे हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तरीसुद्धा आम्ही आमची ताकद दाखवणारच असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.
[ad_2]