अनिल वीर सातारा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक कोरेगाव तालुक्यात प्रति सरकारच्या नेतृत्वाखाली इंग्रजांची दमछाक करणारे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार कॉम्रेड काका कदम यांचा स्मृतिदिन गुरुवार दि.५ जून रोजी खेड, ता. कोरेगाव या त्यांच्या गावी साजरा होणार आहे.
सदरच्या कार्यक्रमानिमित्त दुपारी १२ वाजता परिसरातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करपण्यात आले आहे. तसेच विविध मान्यवरांचे शेती आणि सध्य परिस्थिती वर मार्गदर्शन होणार आहे.याकामी, खेड ग्रामस्थ, शेतकरी युवा मंच, शहिद भगतसिंग स्मृती समिती, राष्ट्र सेवा दल आदी संघटना अथक असे परिश्रम घेत आहे.