सातारा प्रतिनिधी : दह्याट, ता.वाई येथील भारतीय बोध्द महासभा या मात्रसंस्थेचा १९९० पासूनचे बोध्दाचार्य राहिलेले केंद्रीय शिक्षक सुनील सपकाळ यांना नुकताच बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे शामराव बनसोडे व बी.एल.माने यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
सपकाळ यांनी सामाजिक,शैक्षणिक, सहकार व धार्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी गेली ३५ वर्ष करीत आहेत.भारतीय बोध्द महासभा या संस्थेच्या माध्यमातून वाई तालुकाध्यक्ष म्हणून ५ वर्ष व सातारा जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस म्हणून सन २०१२ ते २०१९ अखेर जिल्ह्यात बोध्द धम्माचे भरीव काम केले.शिवाय, महाविहार बाधंकामात अग्रेसर होते.
एन एम आगाणे काका (माजी राष्ट्रीय सचिव) यांच्या माध्यमातून आबेडकर परीवाराशी आपुलकीचे कौटुंबिक सबंध आहेत.भारतीय बोध्द महासभा या सस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर , संस्थेचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष डॉ.ऍड.भिमराव आबेडकर यांच्याशी आपुलकीचे व कौटुंबिक संबंध आहेत.