कोपरगाव प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अंगणवाडी मदतनीस सविता लक्ष्मण जावळे व आशा सेविका सौ रोहीणी नंदकिशोर चव्हाण यांना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल श्रीफळ सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्रक व रोख स्वरूपात रक्कम देत सौ जावळे व सौ चव्हाण यांना गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या सह्यांचे प्रशस्तीपत्रक त्यांना देण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपसरपंच संजय गुडघे,निरंजन गुडघे, बाबासाहेब फटांगरे, धर्मा जावळे, हरिभाऊ जावळे, पांडुरंग जावळे, चिलू जावळे, आबासाहेब जावळे, कल्याण जावळे, किशोर जावळे, कर्णा जावळे, हेमराज जावळे, शांतीलाल जावळे,चिल्हु जावळे,बबलु जावळे, काशिनाथ खरात, ग्रामपंचायत अधिकारी भानुदास दाभाडे, भाऊसाहेब खरे, मच्छिंद्र गुडघे , पुंजाहरी आव्हाड, आशाताई फटांगरे, सुनंदा खरात, लताताई जावळे, कल्पनाताई जावळे, अलका गुडघे,सौ घोंगडे, मंदाबाई गुडघे, श्रीमती सोनवणे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत अधिकारी भानुदास दाभाडे यांनी प्रास्ताविकात या पुरस्काराचे महत्त्व विशद केले. बाबासाहेब फटांगरे, किशोर जावळे, कर्णा जावळे, लक्ष्मण जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. पाणीपुरवठा विभागातून सिताराम गांगुर्डे सेवानिवृत्त झाले व कृषी सहाय्यक संदीप राठोड यांची भोजडे यथे बदली झाली त्यांचा सन्मान करण्यात आला तर आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल भानदास दाभाडे यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार निरंजन गुडघे यांनी मानले.