[ad_1]
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2025 आणि महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) स्पर्धेचे देवा श्री गणेशा…… तांबडी चामडी…. लालपरी…..टीप टीप बरसा पाणी….काला चष्मा.. देसी बॉईज…तू मेरा ह
.
या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगची सुरुवात गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाली. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, मानद सचिव अॅड. कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य शुभेंद्र भांडारकर, सुहास पटवर्धन, राजू काणे, सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड,केशव वझे, अजय देशमुख, कल्पना तापीकर, सीईओ अजिंक्य जोशी, तसेच सर्व संघमालक, सर्व जिल्हा संघटनेचे सदस्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या पर्यटकांना श्रध्दाजली वाहण्यात आली.
एमपीएलच्या तिसऱ्या पर्वासाठी प्रेक्षक इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. एमपीएल २०२४ स्पर्धेला उस्त्फुर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभला. तसेच प्रतिसाद यावर्षी देखील मिळेल, असा मला विश्वास वाटतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन गुणवान खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा असल्याचे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केला.
रोहित पवार पुढे म्हणाले की, या सर्व सामन्यांचे स्टार स्पोर्टस 2 या वाहिनावरून तसेच जियो सिनेमा वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने पुण्याबाहेरील प्रेक्षकांना ही या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.या एमपीएल स्पर्धेमध्ये 4 एस पुणेरी बाप्पा, पीबीजी कोल्हापुर टस्कर्स, रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स हे संघ झुंजणार आहेत. तर डब्लूएमपीएल स्पर्धेमध्ये पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर स्मॅशर्स आणि रायगड रॉयल्स यांच्यात चुरस होणार आहे.
सामन्यांसाठी मोफत तिकिट
सर्व सामन्यांसाठी मोफत तिकिट इतर असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये सामना पाहण्यासाठी तिकिट विकत घ्यावे लागते. पण एमसीएने मात्र सर्वसामान्य क्रिकेटर रसिकांना सामन्यांना आनंद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर घेता यावा म्हणून दरवर्षीप्रमाणे मोफत तिकिट ठेवले आहे. पार्किंगची मुबलक सेवा उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांना ही या सामन्यांसाठी आणण्यात येणार आहे.
[ad_2]