IPL 2025 RCB Victory bengaluru stampede chinnaswamy stadium fans police lathicharge deputy cm dk shivakumar

0

[ad_1]

Stampede in RCB Victory Celebration: आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. 18 वर्षानंतर पहिल्यांदाच आयपीएल जिंकली असल्याने बंगळुरुच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला होता. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामुळे येथे हजारोंच्या संख्येने चाहते पोहोचले होते. यादरम्यान मैदानाबाहेर तुफान गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. गर्दी अनियंत्रित होती असं उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांचं म्हणणं आहे.

घटनास्थळावरुन आलेल्या व्हिडीओमध्ये चिन्नास्वामी मैदानाबाहेर कशाप्रकारे चाहत्यांनी गर्दी केली होती हे दिसत आहेत. गर्दी अनियंत्रित झाल्याने तिथे उपस्थित वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे. व्हिडीओत कारची नेमकी काय स्थिती झाली होती हे स्पष्ट दिसत आहे.

चाहते आपल्या विजयी खेळांडूची एक झलक पाहण्यासाटी चिन्नास्वामी स्टेडिअमच्या भिंतींवरही चढले होते. इतकंच नाही तर झाडांच्या सहाय्याने मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करुन त्यांना तेथून पळवावं लागलं. 

कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने केलं होतं सत्कार कार्यक्रमाचं आयोजन

बंगळुरुचे चाहते आपल्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी पोहोचले होते. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाच्या माध्यमातून आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथे कर्नाटक सरकारमधील अनके मंत्री उपस्थित होते. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमारही येथे उपस्थित होते.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here