[ad_1]
कळमना पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत कारवाई करीत २७ लाखांचा १०८ किलोग्राम गांजा पकडल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. अविनाश संजय ढोके व पलाश विदयाधर वानखेडे ही आरोपींची नावे आहे.
.
शहरात गांजाची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्या मार्फत मिळाली होती. एम. एच. ४०, वाय ९९६२ क्रमांकाचा आयशर सहा चाकी ट्रकमध्ये जबलपूर येथून गांजाची खेप घेऊन एच. बी. टाऊन येथून यशोधरानगर हद्दीमध्ये येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्या नंतर तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांच्या दोन टीम तयार करून एक टीम एच. बी. टाऊन चौक येथे ब्रिज खाली व दुसरी टीम चिखली चौक येथे ठेवण्यात आली. दरम्यान आयशर ट्रक जबलपुर हायवे रोडने कळमना हद्दीत येताना काली माता मंदिर जवळ रोडवर उभा होता.
दोघे जण ट्रकमधून पोती काढून मागे उभ्या असलेल्या एम.एच. ३१, ई. के. ५२३२ क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या महिन्द्रा एक्स. यु. वी. ५०० मध्ये टाकताना दिसून आले. चाहुल लागताच दोघेही गाडी घेऊन पळुन जाण्याच्या बेतात असताना थांबविले. त्यांच्या ताब्यातून गांजा वाहनांसह जप्त करण्यात आला. यामध्ये नागपुर शहर तसेच बाहेरील राज्यातील आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
[ad_2]